Ad will apear here
Next
जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी भारतीय संघ रवाना
नवी दिल्ली  :  जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघातील ४८ स्पर्धकांना नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष सोहळ्यात निरोप देण्यात आला. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने (एनएसडीसी) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचे आयोजन केले होते. या स्पर्धेत भाग घेणारा भारताचा संघ सर्वांत मोठा संघ आहे. २२ ते २७ ऑगस्टदरम्यान रशियातील कझान येथे ही स्पर्धा होणार आहे. यासाठी ६० देशांतून १५०० हून अधिक स्पर्धक विविध ५६ कौशल्य स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत.    
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZTJCD
Similar Posts
जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज नवी दिल्ली : रशियात ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी अर्थात ‘ऑलिम्पिक्स ऑफ स्किल्स’करिता भारताचा संघ सज्ज झाला असून, १८ राज्यांमधून निवडण्यात आलेल्या ४८ स्पर्धकांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाने नुकतीच या संघाची घोषणा केली.
नेपाळशी मैत्रीला कराराचे ‘इंधन’ नवी दिल्ली : भारताने नेपाळला दर वर्षी १३ लाख टन इंधनाचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. या करारानुसार इंडियन ऑइल ही सरकारी कंपनी पुढील पाच वर्षे नेपाळला पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा नैसर्गिक वायू, केरोसीन, हवाई इंधन यांचा पुरवठा करणार आहे.  भौगोलिकदृष्ट्या भारत आणि चीनच्या मध्यभागी असणाऱ्या
सौदी अरेबियाची गुंतवणूक वाढावी यासाठी ‘इंडिया इन्व्हेस्ट ग्रिड’ची स्थापना नवी दिल्ली : सौदी अरेबियाची भारतातील गुंतवणूक वाढवण्यासाठी ‘इन्व्हेस्ट इंडिया ग्रिड’ची स्थापना करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या नीती आयोगाच्या शिष्टमंडळाच्या भेटीत ‘इन्व्हेस्ट इंडिया ग्रिड’ची घोषणा करण्यात आली.
देशातील पहिली एअरट्रेन नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर होणार नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्गत प्रवासासाठी लवकरच ‘एअरट्रेन’ सुरू केली जाणार आहे. एअरट्रेन म्हणजे खास विमानतळासाठी असलेली मेट्रो रेल्वेची सुविधा. अशी सुविधा असणारा हा देशातील पहिला विमानतळ ठरणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language